मुंबई, 02 सप्टेंबर : बाॅलिवूडचे लोकप्रिय कोरिओग्राफर गणेश आचार्य यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना समोर आलीये. डान्सर फेडरेशनच्या दोन सदस्यांनी गणेश आचार्य यांना धमकी दिल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणी अंबोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

गणेश आचार्य यांनी हिंदी आणि मराठीतील अनेक चित्रपटांमध्ये नृत्य दिग्दर्शन केलंय. एबीसीडी या चित्रपटात त्यांनी अभिनयही केलाय. काही दिवसांपासून त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळत होती.

डान्सर फेडरेशनच्या दोन सदस्यांनीच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली हे आता उघड झालंय. त्यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी ते देत होते.

अखेर गणेश आचार्य यांनी अंधेरी पश्चिम येथील आंबोली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केलीये. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस याबद्दल तपास करत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours