जिल्हा संपादक शमीम आकबानी, क्राईम रिपाेर्टर संदीप क्षीरसागर
लाखनी- दि.३१-८-२०१८ राेजी पाेलीस अधिक्षक विनीता साहु यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस स्टेशन लाखनी चे ठानेदार मंडलवार व सहकारी कर्मचाऱ्यांनी वेळीच सतर्कता दाखवुन शिताफीने ट्रक क्र.CG04DC 9286 वाहन किमती १०,००,०००(दहा लक्ष ) रु.सदर ट्रक मधे ५ म्हशी व १२नग हेले काेणत्याही  शासकिय परवानगी व पशुवैद्यकिय अधिकारी यांचे प्रमाणपत्र शिवाय तसेच जनावरांचे आराेग्य बाबत व्यवस्था न करता अपुऱ्या जागेत जनावरांना काेंबुन त्यांना त्रास हाेईल अश्या स्थितीत वाहतुक करतांनी मिळुन आल्याने आराेपी जमील खान कामठी राेड (टेकानाका) नागपुर यांच्या  विरुद्ध पाेलीस स्टेशन लाखनी येथे कलम ११(१)(घ)(ड) सहकलम ११९ मपाेका सहकलम ८३मपाेका अन्वये गुन्हा नाेंद केला आहे सर्व गाेधन (जनावर) यांना त्यांच्या आराेग्या च्या दृष्टिने गाैशाळा पिंपळगाव सडक येथे ठेवन्यात आले आहे गुन्ह्याचा पुढिल तपास पाेलिस उपनिरीक्षक ताराम करित आहेत


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours