जिल्हा संपादक शमीम आकबानी
अड्याळ : पाेलिस ठाणे अंतर्गत काेसरा येथे राहणारा इब्राहीम करीम शेख याने स्वत:चे मुलीवर बलात्कार केल्याचे आराेप सिद्ध झाल्याने दि.१-९-२०१८ राेजी जिल्हा सत्र न्यायालय न्यायाधिश सचीन भंसाली यांनी आजन्म सश्रम कारावास व २५०००रु.द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे.
--------प्राप्त माहिती अशी कि,पिडीताची आई दि.१०-१०-२०१६ राेजी सकाळी १०वाजता काेसरा ग्रामपंचायत येथे मिटींग करिता गेल्याने तिचा पती इब्राहीम शेख हा शेतावर आैषधी फवारणी करिता निघुन गेला व मुलगी ही एकटीच घरी हजर हाेती.दुपारी १च्या सुमारास इब्राहीम शेख हा घरी परत आला व आपल्या मुलीला जेवण देण्यास सांगितले मुलगीने जेवण देऊन झाल्यावर मधले खाेलीत झाेपली असता तिच्या वडिलाने मुलगी हिचे जबरीने ताेंड दाबुन विवस्त्र करुन बलात्कार केला व याबाबत काेणालाही काही सांगितल्यास ठार मारन्याची धमकी दिली.पिडीत मुलीने घटणेबाबत सर्व हकीकत आपल्या आईला सांगितल्याने पिडीत मुलीची आई हिने पाेलीस स्टेशन अड्याळ येथे येऊन पाेटच्या मुलीवर कुकर्म करणाऱा पती इब्राहीम शेख याच्याविरुद्ध तक्रार करुन आरापी विरुद्ध अपराध क्र.५७/१६कलम ३७६(१)(२)(फ),५०६भा.द.वि .अन्वये नाेंद करन्यात आला.सदर गुन्हाचा तपास सहा.पाेलीस निरीक्षक गफ्फार शेख यांनी सुरु करुन गुन्हातील आराेपी इब्राहीम शेख यास तत्काळ अटक करुन पिडीताची व  आराेपीचि वैद्यकिय तपासणी करुन गुन्ह्यात साक्ष पुरावा गाेळा केला.आऱाेपी विरुद्ध याेग्य व सबळ पुरावे मिळुन आल्याने आराेपपत्र जिल्हा व सत्र न्यायालय भंडारा येथे दाखल केले.व आज दि.१-९-२०१८राेजी गुन्हाचे स्वरुप व गंभिरता लक्षात घेऊन आराेपीवर दाेषसिद्ध झाल्याने आजन्म कारावास व पिडीतेस २५,०००रु.नुकसान भरपाई देण्याचे आदेशित केले
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours