मुंबई- आज पहाटे ४.३० च्या सुमारास विक्रोळी- जोगेश्वरी लिंक रोडवर जोगेश्वरीच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर पवईच्या सुवर्ण मंदिर जवळ ट्रकला अपघात झाला. अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नसून, ट्रक चालक आणि त्याच्या साथीदाराचाचा जीव थोडक्यात बचावला. ट्रक रस्त्यावर उलटल्यावर ट्रकची इंधन टाकी फुटली त्यामुळे रस्त्यावर डिझेल सांडले आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. हा ट्रक रस्त्यावर उलटला असल्याने जोगेश्वरी कडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पवई आयआयटी गेटपासून पुढे काही अंतरापर्यंत हे बदल करण्यात आले आहेत. अपघात होता काही वेळातच वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहलचले. ट्रकमध्ये माल भरलेला असल्याने ट्रक बाजूला काढण्यासाठी मोठी क्रेन मागवण्यात आली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours