मुलीला पळवून नेण्यास मदत करण्याच्या वक्तव्यामुळे भाजपचे आमदार राम कदम अडचणीत सापडले होते नुकताच त्यांनी माफीनामा सादरही केला. पण आता तर खुद्द राम कदम यांनी आणखी एक वाद ओढावून घेतलाय. अभिनेत्री सोनाली बेंद्रेचं निधन झालं असं राम कदमांनी जाहीरच करून टाकलंय.
राम कदम यांनी आज दुपारी 1.50 च्या सुमारास एक टि्वट केलंय. या टि्वटमध्ये राम कदमांनी सोनाली बेंद्रे यांचं निधन झाल्याचं जाहीर केलं.
राम कदम टि्वटमध्ये, "हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमधली अभिनेत्री आणि एकेकाळी सर्व प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी आणि आपल्या अभिनयाने सर्वांचे डोळ्याचे पारणे फेडणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे पडद्याआड...यांचं अमेरिकेत निधन झालं आहे. भावपूर्ण श्रद्धांजली..." असं लिहिलंय.
आपल्याकडून चुकून टि्वट झालंय हे लक्ष्यात आल्यावर अर्ध्यातासानंतर त्यांनी ते टि्वट डिलिट केलंय. आणि "सोनाली बेंद्रे यांच्या निधनाबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होवो अशी मी प्रार्थना करतो' अशी सारवासारव करत नवीन टि्वट केलं.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours