मुंबई,ता.28 जून : विमानाच्या पायलटने प्रसंगावधान दाखवल्यामुळं मुंबईत मोठी दुर्घटना टळली नाही तर शेकडो लोकांचा जीव गेला असता. घाटकोपर हा मुंबईतला सर्वाधिक दाटीवाटीची वस्ती असलेला भाग आहे. उंच इमारती, झोपडपट्ट्या आणि व्यावसायिक संकुलं या भागात आहेत.
घाटकोपरमधल्या सर्वोदय रुग्णालयाजवळ हे चार्टर्ड विमान बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ कोसळलं. हे बांधकामं सुरू असलेल्या जागेच्या परिसरात अनेक मोठ्या सोसायट्या आहेत. सात ते आठ मजल्यांच्या या सोसायट्यांमध्ये काही हजार नागरिक राहतात.  त्यामुळं विमान दुसऱ्या भागात कोसळलं असतं तर काही शे लोकांचा जीव वाचला.
40 कामगार थोडक्यात बचावले
इमारतीच्या बांधकामासाठी असलेले 40 मजूर दुपारची वेळ असल्याने जावायला गेले होते. त्यामुळं ते वाचले नाही तर मोठा अनर्थ घडला असता. या भागात बसेस आणि वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणात असते. मात्र विमानाचं नियंत्रण आपल्याहातात नाही हे कळताच पायलटने मोकळ्या जागेत विमान उतरवण्याचा प्रयत्न केला आणि शेकडो लोकांचे जीव वाचले.
हा होता विमानाचा क्रु
-कॅप्टन पी एस राजपूत
-को-पायलट मारिया कुबेर
-तंत्रज्ञ - सुरभी
-तंत्रज्ञ मनीष पांडे
ब्लॅक बॉक्स सापडला
घाटकोपरमध्ये कोसळलेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. अग्निशमन दल आणि मदत पथकाला हा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. विमान कोसळल्यानंतर प्रचंड मोठा आवाज झाला आणि आग लागली. त्यानंतर अग्निशमन दल, मुंबई पोलीस आणि एनडीआरफची टीम घटनास्थळी दाखल झाली.
मदत पथकाने विमानाचा काही भाग कापून काढला आणि मलबा हटवण्यात आला. त्याचवेळी ब्लॅक बॉक्स शोधण्याचं कामही सुरू होतं. त्या शोधकार्यावेळीच ब्लॅक बॉक्स सापडल्याने विमानाच्या अपघाताचं घरं कारण कळणार आहे. विमानापर्यंत पोहोचणं शक्य असल्याने ब्लॅक बॉक्स शोधायला फारसा वेळ लागला नाही.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours