ठाणे : जंगलांनी समृद्ध असलेल्या ठाणे जिल्ह्यात तस्करांचे कारनामे वनाधिकाऱ्यांनी उघड केले आहेत. चंदन आणि सागवानसारख्या मौल्यवान झाडांच्या लाकडांची तस्करी करण्यासाठी या तस्करांनी गाड्यांवर चक्क पोलीस उपायुक्त म्हणजेच DCP आणि पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच PSI अशा पाटया पोलीस अधिकाऱ्यांच्या नावासहीत ट्रकवर लावल्या. अशा पाट्या लावल्याने पोलीस पकडणार नाहीत असा तस्करांचा उद्देश होता. अशी तस्करी सुरू असल्याची खबर वनाधिकाऱ्यांना लागली आणि त्यांनी अशा गाड्या पकडल्या त्यानंतर तस्करांचा हा डाव उघड झाला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours