बीड: बीडच्या संत जगमित्र सूतगिरणी कर्ज घोटाळा प्रकरणी सत्र न्यायालयाने विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना चांगलाच दणका दिलाय. न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्या मालमत्तेवर विक्री आणि हस्तांतरावर निर्बंध घातले आले आहे.
राज्यभर गाजलेला बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळ्याची न्यायालयीन प्रक्रीया सुरू झाली असून परळी येथील संत जगमित्र सुतगिरणी कर्ज घोटाळा प्रकरण विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या समोर मोठ्या अडचणी वाढल्या आहेत.
या प्रकरणाची अनेक वर्ष प्रलंबित न्यायालयीन प्रक्रिया अखेर सुरु झाली असून अंबाजोगाई जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जगमित्र सुतगिरणी प्रकरणी तीन कोटी रुपयांची वसुली करण्याकरीता धनंजय मुंडे यांचे घर, ऑफिस तसंच विविध ठिकाणी असलेल्या मालमत्ता पुढील आदेश येईपर्यंत त्याचा कुठलाही लाभ तसंच हस्तांतर शिवाय विक्री न करण्याचे आदेश दिले आहेत.
संत जगमित्र सुतगिरणी गैरव्यवहार प्रकरणी कोर्टाने कडक ताशेरे ओढत धनंजय मुंडे यांची देशमुख टाकळी, कौडगाव, जलालपुर येथील शेतजमिनीसह परळी येथील अंबाजोगाई रोडवरील घर, जगमित्र ऑफिस यावर अॅट्याचमेंट ची कारवाई चे आदेश दिले आहेत.
संत जगमित्र सुतगिरणीसाठी बीड जिल्हा सहकारी बँकेकडुन कर्ज घेताना अनेक नियमांचे उल्लंघन करुन कर्ज बुडीत केल्या गेल्यानंतर या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यासहित संत जगमित्र सुतगिरणीच्या संचालक मंडळांवर गुन्हे प्रलंबित होते. गेल्या तीन वर्षांपासून या प्रकरणी न्याय मिळण्याकडे ठेवीदार शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours