बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीने आता दुधासह पाच नवीन उत्पादन लाँच केली आहे. आता तुम्हाला पतंजलीचे दूध, दही, छास, पनीर आणि पाणी सुद्धा मिळणार आहे. तसंच पतंजलीने शेतकऱ्यांसाठी सोलर लॅम्प सुद्धा लाँच केलाय. पतंजलीने गायीचे दूधाचे दर 40 रुपये प्रतिलिटर ठेवले आहे. जे बाजारात इतर उत्पादनापेक्षा 2 रुपयांनी स्वस्त असल्याचा दावा पतंजलीने केलाय.

1. डेयरी प्रोडक्ट्स (गाय दूध, दही, छास, पनीर) पतंजलीने गायीच्या दुधापासून तयार होणारे पदार्थ बाजारात उतरवले आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली-एनसीआर, राजस्थान, हरियाणा, राजस्थान, हरियाणा आणि महाराष्ट्रात या उत्पादनाची विक्री सुरू होणार आहे. त्यानंतर इतर राज्यात हे उत्पादन सुरू होणार आहे. तसंच पतंजली लवकरच आइस्क्रीम आणि इतर उत्पादनही बाजारात आणणार आहे.

2. दुग्धामृत (चारा) पतंजलीने दुग्धामृत ब्रँड अंतर्गत युरिया रहित कॅटल फीड आणि फीड सप्लीमेंट सुद्धा लाँच केलीये.

3. फ्रोजन भाज्या कंपनीने फ्रोजन भाज्या लाँच केल्या आहे. यामध्ये मिक्स व्हेज, स्वीट काॅर्न, पोटेटो फिंगर आणि वाट्टाणे लाँच केले आहे. कंपनीचा दावा आहे की इतर कंपन्यांच्या उत्पादनापेक्षा 50 टक्के स्वस्त असणार आहे.

4. सोलर पॅनल, सोलर लाइट्स कंपनीने सोलर स्ट्रीट लाईट, सोलर हाईब्रिड इन्वर्टर आणि सोलर वॉटर पंप सुद्धा बाजारात उतरवले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours