लाखनी (भंडारा महाराष्ट्र)
जिल्हा संपादक शमीम आकबानी, क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर
लाखनी- लाखनी तालुक्यातील मचारणा ह्या गावात अंबादास रामचंन्द्र ढाेके ह्या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा व अतिवृष्टीने राहते घर पडल्यामुळे शेतकऱ्याने ३-९-२०१८ ला  विषारी द्रव प्राषन करुन आपली जीवनयात्रा संपवली हाेती.
-----सविस्तर असे कि,अंबादास ढाेके यांच्यकडे २ हेक्टर शेतजमीन असुन त्यात ते धानाचे पीकं घेत असतं.सातबाऱ्यावर मृतकाच्या वडिलांचे नाव असुन ते जिल्याबाहेर मृत्यु पावल्याने मृत्यु प्रमाणपत्र मिळाले नाही.यामुळे वारस फेरफार तलाठी कार्यलयात अनेक महिन्यांपासुन प्रलंबित आहे.त्यांनी विवीध कार्यकारी सेवा सहकारी सेवा संस्था मचारणा कडुन ५२ हजार रुपयांचे पीक कर्ज घेतले हाेते.खातेदार मृत्यु पावल्याने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान याेजनेत नाव समाविष्ट केले गेले नव्हते पण सहकारी संस्थेने अंबादास ढाेके यांच्या नावाने ते कर्ज रुपांतरित केले हाेते.शेतीत उत्पादन हाेत नसल्याने त्याने नातेवाईक व मित्रमंडळींकडुन उसनवार रक्कम घेतली हाेती.सध्या त्याच्यावर १ते सव्वालाख रुपयांचे कर्ज हाेते.त्यातचं तालुक्यामधे झालेल्या अतिवृष्टीने त्याचे राहते घर देखील पडल्याने त्याचा मानसिक आघात झाला हाेता.वेळेवर कर्जाची परतफेड करु न शकल्यामुळे समाजात व नातेवाईकात आपली बदनामी हाेईल अशी त्याला भिती निर्माण हाेऊ लागली त्यामुळे ३ सप्टेंबर सकाळी ६ वाजता घरी काेणीच नसतांनी अंबादास ढाेके ह्याने विषारी द्रव प्राषण करुन त्याने आत्महत्या केली हाेती.मृतक शेतकरी अंबादास ढाेके यांच्या परिवारामागे पत्नी,मुलगा असा परिवार आहे.मृतक शेतकरी यांच्या घरी शेतकरी संकटमाेचन संघटनेचे संयाेजक डॉ.अजयजी तुमसरे यांनी भेट देऊन शासनाला याेग्य ताे पाठपुरावा करुन आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या कुटुंबाला यावेळी याेग्य ती शासनमदत मिळवुन देण्याचे आश्वासन दिले. कर्जबाजारिपणा मुळे शेतकऱ्याची आत्महत्या झाल्यामुळे घटना हाेऊन एक आठवडा लाेटुन सुद्धा जिल्यातील एक ही लाेकप्रतिनीधीने मचारणा ह्या गावात पाेहचुन आत्महत्याग्रस्त शेतकरी च्या कुटुंबाला भेट दिली नसुन गावकऱ्यांमधे यावेळी तिव्र ऩाराजी दिसुन आली.
------डॉ.अजय तुमसरे यांच्या साेबत यावेळी ,सरपंच मचारणा संगीता घनमाेडे,पाेलीस पाटील लाेमेश्वर काताेरे,साेसायटी अध्यक्ष संताेष कुथे,सुरेखा झलके,धिरज घाेनमाडे,पवन शेंडे,सविता कुथे,निर्मलाशेंडे,इंदिरा काताेरे,शालु घनमाेडे,राहुल ठवकर,रविन्द्र घनमाेडे,महेश शेंडे प्रामुख्याने उपस्थित हाेते।
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours