अमरावती :  अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात गणेश चतुर्थीच्या दिवशी विठ्ठल बैतुले या वृद्ध शेतकऱ्यांने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्त्या केली

सगळीकडे गणपती बाप्पाचे आगमन होत असतांना अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील भांडारज येथील वृद्ध शेतकरी विठ्ठलराव बैतुले वय 74 या शेतकऱ्याने आपल्या शेतात आज आत्महत्या केली. त्यांच्याकडे दीड एकर शेती होती, सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि पिकांना लावण्यासाठीची चन चन या आणि इतर कारणाने ते त्रासले होते. शेतात कपाशीचे पिक आहे पण कपाशीच्या झाडाला बोंड नसल्याने त्यांनी लावलेला खर्च निघणार की  नाही  ही काळजी त्यांना होती.

त्यामुळे त्यांनी आपलाच शेतात गळफास लावून आत्महत्त्या केली अशी प्राथमिक माहिती समोर आली. सकाळी शेतात चक्कर मारायला गेले आणि परत न आल्याने शेतात शेजाऱ्यांनी जाऊन पाहिले तर ते झाडाला टांगलेल्या अवस्थेत दिसले. या प्रकरणाचा तपास अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन करीत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours