●दोन उपोषणकर्त्याना सामान्य रुग्णालयात भर्ती●
●धनगर समाज आरक्षण●
●प्रकरण चिघळण्याच्या पवित्र्यात●
●जिल्हा कचेरी समोर उपोषण सुरुच●
प्रकाश हातेल
भंडारा-धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या अंमलबजावणीला शासनाकडून विलंब होत असल्याने धनगर समाज संघर्ष समिती जिल्हा भंडाराच्या वतीने बसलेल्या आमरण उपोषणात उमेश श्रीकृष्ण हातेल व राजेश अशोक पेरे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
धनगर समाज संघर्ष समिती भंडारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भंडारा जिल्हाध्यक्ष राजकुमार मरठे,जय शंकर घटारे,मंगलदास खऊळ,राजेश पेरे,उमेश हातेल,दिनेश अहिर,सोनु हातेल,उपोषणाला बसले आहेत.
यामध्ये उपोषणाचे तिसऱ्याच दिवशी उपोषण कर्ते उमेश हातेल,राजेश पेरे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सामान्य रुग्णालयात भर्ती करण्यात आले. मात्र सत्तेत येवून चार वर्षाचा कालखंड लोटून आजमितीलाहि धनगर आरक्षणाचा विषय ताटकळत ठेवला आहे.तर टिस चा अहवाल शासनाला प्राप्त होवूनहि राज्य शासन केंन्द्रसरकारला अहवाल पाठविण्यात वेळ काढू धोरणाचाअवलंब करित आहे. धनगर समाजाचा आरक्षण अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी अन्यता परिस्थिती चिघळण्याच्या मार्गावर आहे. उपोषण कर्त्याची प्रकृती चिंताजनक होत आहे.तर समाज बाधवांनी उग्ररुप धारण केले आहे.समाज बांधव मागण्या तात्काळ मार्गी न लागल्यास जलसमाधी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे बोलले जात आहे.
उपोषण मंडपाला युवा काँग्रेस डाँ.पंकज कारेमोरे,राँ.का.ता.अध्यक्ष देचंद ठाकरे,जि.प.सभापती भंडरा रेखा ठाकरे,सम्राट अशोक सेना अध्यक्ष तुलशिराम गेडाम, नितुवर्षा मुकूर्णे,प्रमोद फोपसे,इंजि.संजय पुनसे,वर्षाव अहिर,केवळराम पडोळे,पी.एस.अहिर,ज्ञानेश्वर करताळे,चंद्रशेखर अहिर आदिनी भेट दिली.
Post A Comment:
0 comments so far,add yours