अजय मेश्राम
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आमसभा

प्रतिनिधी/भंडारा।16 सप्टें
दि भंडारा डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-ऑप. बँकेचा उद्देश फक्त शेतक-यांचा व सभासदांचा हित साधणे हाच आहे. शेतकरी हेच बँकेचे खरे मालक आहे. यामुळे शेतकरी सभासदांना निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही बँकेचे अध्यक्ष सुनिल पुंâडे यांनी दिली. ऑडीट वर्ग अ असलेल्या या बँकेची आमसभा १६ सप्टेंबर २०१८ रोजी लक्ष्मी सभागृहात पार पडली. यावेळी बोलतांना त्यांनी वरील ग्वाही दिली.
यावेळी आ. चरण वाघमारे, अर्बन बँकेचे अध्यक्ष महेश जैन, बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, बँकेचे ज्येष्ठ संचालक कैलाश नशिने, रामलाल चौधरी, रामराव कारेमोरे, रामदयाल पारधी, होमराज कापगते, विलास काटेखाये, सत्यवान हुकरे, प्रशांत पवार, डॉ. श्रीकांत वैरागडे, वासुदेव तितीरमारे, अंजिराबाई चुटे, कवलजितसिंह चढ्ढा, नरेंद्र बुरडे, विनायक बुरडे, योगेश हेडावू, जि.प. अध्यक्ष रमेश डोंगरे, सभापती धनेंद्र तुरकर, माजी आमदार आनंदराव वंजारी, तुमसर कृउबासचे सभापती भाऊराव तुमसरे यांच्यासह इतरांची प्रमुख उपस्थिती होती.
सुनिल पुंâडे पुढे म्हणाले, सन २००५-०६ पासून बँक सतत, निव्वळ नफ्यात आहे. चालुवर्षी बँकेला १०.२८ कोटी ढोबळ नफा झाला असून २.०४ लक्ष निव्वळ नफा झालेला आहे. भंडारा, साकोली, पवनी, तुमसर येथे शेतकNयांना मार्गदर्शन करण्यासाठी आर्थिक साक्षरता केंद्र  स्थापन करण्यात आले आहे. कुठल्याही शाखेतून ग्राहक व्यवहार व एसएमएस अलर्ट सुविधा बँकेत सुरु आहे. तसेच एटीएम, नेट बँकिंग सुविधा ग्राहकांना उपलब्ध करुन दिली आहे. बँकेचे ९ एटीएम केंद्र सुरु आहेत. या महिन्याचे अखेरपर्यंत ११ एटीएम केंद्र सुरु होणार आहेत. शेतकरी बांधवासाठी थेट कर्ज योजना शताब्दी वर्ष कृषि पत धोरण अंतर्गत शेतकऱ्यांना थेटकर्ज वाटप सुरु केले आहे. शेती क्षेत्र जास्तीत जास्त ओलीताखाली आणण्यासाठी प्राधान्याने जलसिंचनासाठी मध्यम, दिर्घमुदती कर्जपुरवठा, गोदाम बांधणे, दुरुस्तीसाठी बचत गटांना कर्जपुरवठा करणे सुरु आहे. प्रधानमंत्री मुद्रा लोन, सोनेतारण, पगारतारण व पेंशनतारण कर्जाची सोय आहे. बँकेचे २००६ मध्ये विभाजन झाल्यानंतर एकुण भागभांडवल १०.४१ कोटी व ठेवी २६३.१७ कोटी होते. मात्र आमसभेशी संबंधित वर्ष अखेर बँकेत एकुण भागभांडवल ३६.७०कोटी व एवूâण ठेवी ९८६.५८ कोटी आहेत. पुढील वर्षी किमान ११०० कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत असतील अशी
अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.बँकेला चालु वर्षी पिक कर्ज वाटपाचे शासनाकडून दिलेले उद्दिष्ट २८० कोटीचे आहे. आतापर्यंत बँकेने ५६ हजार सभासदांना २४३.७० कोटीचे पिककर्ज वाटप केलेले आहे. विशेष म्हणजे, हे सर्व कर्ज बँकेने स्वनिधीमधूनच केले आहे. शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यामुळे सभासदांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे चालू हंगामात बँक स्तरावर शेती कर्जाची वसुली ५० टक्के झाली आहे. परंतु, पुढील वर्षी प्रत्येक संस्थेनी चालू व थकीत कर्जाची १०० टक्के वसुली करुन आपल्या संस्थेला मदत करावी, असेही आवाहन सुनिल फुंडे  यांनी केले.अहवाल वर्षात बँकेचा ग्रॉस एनपीए ३९.०२ टक्के असून नेट एनपीए ३३.०३ टक्के आहे. त्यामुळे संलग्न संस्थांनी मागणी केल्याप्रमाणे लाभांष वाटप करता येत नाही. नाबार्डच्या परिपत्रकीय सुचनानुसार एनपीए ५ टक्के पर्यंतच असणे आवश्यक आहे. तरच लाभांशाचे वाटप करता येते, अशीही माहिती सुनिल पुंâडे यांनी दिली. कायद्यानुसार १५ मे अखेरपावेता संस्थांचे वार्षिक हिशोबपत्रके सादर करणे बंधनकारक असूनही संबंधित संस्थांनी आपले वार्षिक हिशोब पत्रके निर्धारित वेळेत सादर केले नाही तरीही बँकेने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी त्या संस्थांना कर्जपुरवठा सुरु ठेवला आहे. सन २०१५-१६ व २०१६-१७ चे वेंâद्र शासनाकडील रुपये ५७०.४४ लक्ष व्याजाची रक्कम अद्याप अप्राप्त असून सन २०१७-१८ चे व्याज प्रस्ताव संस्थांकडून बँकेला प्राप्त झाले नाही. सन २००७-०८ ते सन २०१६-१७ पावेतो मार्वेâटिंग पेâडरेशनकडून खड्या हुंडयावरील व्याजाचे एवूâण रुपये ५६१.१० लक्ष अद्याप मिळाले नाही. यामुळे शासनाच्या योजना राबवितांना बँकेने हित कसे सांभाळावे हा प्रश्न संचालक मंडळासमोर येत असतो. अशीही खंत त्यांनी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शासनाकडे दुरुस्त केलेली सभासदाची माहिती पाठविली असून अपेक्षित ग्रीन यादी १२००० ते १५००० सभासदांनी २० सप्टेंबर नंतर येणे अपेक्षित आहे. बँकेनी शेतकरी सभासदांना कर्ज वाटपापासून वंचित राहु नये त्याकरिता खरीप कर्जवाटपाची मुदत वाढवून २९ सप्टेंबर २०१८ पर्यंत करण्यात आली असल्याचेही सुनिल फुंडे म्हणाले.काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमी आहे, असे सांगून बँकेचे कर्मचारी ग्राहकांना वेळेवर सेवा देत नसल्याचा तक्रारी आल्या आहेत. अशा तक्रारी पुन्हा येता कामा नये, कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना वेळेवरच उत्तम सेवा द्यावी असा दम सुध्दा सुनिल पुंâडे यांनी भरला.सर्वप्रथम अहवाल वर्षात दिवंगत झालेल्या देशातील मुत्सदी, शास्त्रज्ञ, सहकारातील अग्रगण्य मान्यवर, समाजसेवक, संशोधक, थोर साहित्यिक, लेखक, क्रिडापटू, शिक्षणतज्ञ, सैनिक, सर्व क्षेत्रातील कलाकार तसेच बँकेचे ठेवीदार व ग्राहक, संस्था सभासद, शेतकरी व बँक कर्मचारी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी स्वतंत्र विदर्भासह विविध ठराव सर्वानुमते पारीत करण्यात आले. सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निराकरण करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours