काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल खळबळजनक विधान केले आहे. थरूर यांनी पंतप्रधानांना चक्क विंचवाची उपमा दिली आहे.  संघाच्या कार्यकर्त्यांचा उल्लेख न करता थरूर  म्हणाले की, " मोदी हे शिवलिंगावर बसले विंचू सारखे आहे. त्यांना हाताने हटवू शकत नाही आणि चप्पलेनंही मारूही शकत नाही."
बंगळुरूमध्ये आयोजित लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये थरूर यांनी हे वक्तव्य केलं. थरूर यांनी आपले पुस्तक  'The Paradoxical Prime Minister' यावर बोलत होते. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, शशी थरूर यांनी मोदीत्वामुळे म्हणजे मोदी आणि हिंदुत्व यामुळे ते पंतप्रधान मोदी म्हणून संघाहुन मोठे झाले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours