बदलापूर आणि नेरळ जवळ असणाऱ्या चंदेरी किल्ल्यावर पर्यटक अडकला आहे. या पर्यटकाला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र, रात्रीवेळी खाली उतरवणे धोकादायक असल्यामुळे सोमवारी सकाळी खाली उतरवण्यात येणार आहे.
चंदेरी या डोंगरालगत गेलेला एका गिर्यारोहकाला रस्ता चुकल्याने तो डोंगरावरचा अडकला आहे. उदय रेड्डी असं त्याचं नाव असून कुळगाव पोलीस स्टेशन आणि स्थानिक आदिवासींच्या मदतीने त्याचा शोध रात्री उशिरा घेण्यात आला.
संध्याकाळी त्याला खाली उतरवायला सुरुवात झाली होती. मात्र रात्री अंधार वाढल्याने यावेळी खाली उतरणे धोकादायक असल्याने त्याला खाली न उतरवण्याचा निर्णय पोलिसांनी आणि स्थानिकांनी घेतला आहे.
या गिर्यारोहकांना खाली आणण्यासाठी पनवेल मार्गे देखील काही गिर्यारोहकांचे समूह आणि बदलापूर वरूनही काही गिर्यारोहकांचे समूह पाठवण्यात आले आहेत.
Post A Comment:
0 comments so far,add yours