मुंबई:  गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे जीएसटी बुडवल्यामुळे मोठी कारवाई करण्यात आली आहे.  ८० कोटींचा जीएसटी बुडवल्याच्या आरोपाखाली पुण्यातील एका व्यापाराला मुंबईत अटक करण्यात आली आहे.
डिरेक्टर जनरल आॅफ जीएसटी इंटेलिन्सने ही कारवाई केली आहे. मोदसिंग सोधा या पुण्याच्या व्यापाऱ्याने 80 कोटींचा जीएसटी बुडवला.
मोदसिंह सोधाला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने मोदसिंह सोधाला  14 दिवसांची  न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मोदसिंग सोधा हा १० बनावट कंपन्या चालवत होता. या कंपन्यांच्या माध्यमातून त्याने 415 कोटींचा गैरव्यवहार केला. हा काळा पैशाचा भ्रष्टाचाराचा प्रकार असल्याचं निष्पन्न झालंय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours