मुंबई: ताडदेवी परिसरातील इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून १६ वर्षांच्या मुलीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताडदेवी येथील इम्पिरियल टॉवरमध्ये ही घटना घडली. प्रियांका कोठारी असं या मृत मुलीचे नाव आहे. शुक्रवारी मध्यरात्री या मुलीने २३ व्या मजल्यावरून उडी मारून जीवनयात्रा संपवली.
इम्पिरियल टॉवर ही ताडदेवीमधील ६० मजल्यांची इमारत आहे. देशातील उंच इमारतीपैकी या इमारतीला मानलं जातं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलगी ही दहाव्या वर्गात शिकत होती. पहाटे २.३० वाजेच्या सुमारास या मुलीने आत्महत्या केली. २३ व्या मजल्यावर हे कुटुंब राहत होतं. या मुलीने घराच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली. इमारतीच्या सुरक्षारक्षकाने लाॅनमध्ये मुलीचा मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर मृत मुलीला नायर रुग्णालयात दाखल करण्यात असतं डाॅक्टरांनी मृत घोषित केलं.
ताडदेव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक संजय सुर्वे यांनी सांगितलं की, पोलीस जेव्हा मृत मुलीचा फोटो घेऊन तिच्या घरी पोहोचले तेव्हा कुटुंबियाला कळालं की तिने आत्महत्या केली. शवविच्छेदन केल्यानंतर मुलीचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला.
Post A Comment:
0 comments so far,add yours