ऐन सणांच्या दिवसांमध्ये चार दिवस बँका बंद असल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागणार आहे. महिन्याच्या सुरूवातीलाच दिवाळी सण आल्याने खरेदीसाठी पैशांचा अवशक्यता असताना बँकांना चार दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सणाच्या दिवसांमध्ये बँकाना दिलेली सुट्टी रद्द केली जाते. परंतू दिवाळीनिमित्त बँकांना दोन दिवस सूट्टी असणार आहे. लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडवा असल्याने 7 आणि 8 नोव्हेंबरला बँक बंद असतील.
आठवड्याच्या शेवटी दिवळी आल्याने बंकांना दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे. त्या पाठोपाठ दुसरा शनिवार आणि रविवारची अधिकृत सुट्टी असल्याने बँका एकूण चार दिवस बंद राहतील. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार भाऊबीजची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करण्यासाठी तुम्हाला एक दिवस उपलब्ध आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours