मावळ: गडकिल्ल्यांचं संवर्धन व्हावं त्याचबरोबर गडकोटांबद्दल आदर आणि तिथे चैतन्याचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी मावळमधील गणेशभक्तांनी तिकोनागडावर गणेशोत्सवाची सुरुवात केलीये. टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत गडावर गणरायची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलीये. बाप्पाच्या आगमनाप्रसंगी तिकोनागड गणपती बाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमुन गेला होता.

गडकिल्ल्यांवर चैतन्याचं वातावरण निर्माण व्हावं. गडकोटांबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर निर्माण व्हावा, गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि संरक्षण व्हावे यासाठी एक प्रयत्न म्हणून किल्ले तिकोणागडावर, तिकोणा पेठ ग्रामस्थ आणि मावळ परिसरातील शिवभक्तांनी या वर्षी पासुन गणेशउत्सवाची सुरुवात केलीय. गडावर गणेशाचं पारंपारीक पद्धतीने आगमन झालं. गणेशाच्या स्वागता करीता मावळे, अब्दगीरी, भगवा झेंडा, असं तयार होतं. टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत गणेशाचं गडावर आगमन झालं. बाप्पांची विधीवत पुजा करण्यात आली. नंतर वितंडेश्वराच्या मंदिरातही पूजा करण्यात आली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours