ओव्हरहेड वायर दुरुस्त करणारी व्हॅन कसारा रेल्वे स्थानकाच्या पुढे दुरुस्ती करत होती, मात्र ही बाब सिग्नल कंट्रोलरच्या लक्षात आली नाही आणि त्याने मागून मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीला सिग्नल दिला.

वेगात येणाऱ्या मालगाडीच्या चालकाला सुदैवाने ही व्हॅन दिसल्याने त्याने वेग कमी केला, मात्र गाडी पूर्ण थांबली नाही आणि मालगाडीने या ओव्हरहेड वायर दुरुस्त करणाऱ्या व्हॅनला धडक दिली.
यात ओव्हरहेड वायर दुरुस्त करणारी व्हॅन रुळाखाली घसरली. सध्या दुरुस्ती सुरू आहे.मात्र यामुळे कसाऱ्याहून मुंबईकडे येणारी रेल्वेसेवा पूर्ण ठप्प झाली आहे.लोकल आणि मुंबईकडे येणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्याही अडकल्या असून डाऊन लाईनवरून मुंबईकडे येणाऱ्या एक्स्प्रेस सोडतायत, मात्र तरीही इगतपुरीपर्यंत एक्सप्रेसची रांग लागली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours