(स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रा.यांची कार्यवाही)
*
नागपुर: जिल्हा संपादक शमीम आकबानी
-----नागपुर ग्रामिण पाेलिस अधिक्षक राकेश आेला यांना अवैधरित्या केराेसिन काळाबाजार करित असल्याची गाेपनिय माहिती मीळताच त्यांनी पाेलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा चे संजय पुरंदरे यांना त्वरित कायदेशिर कार्रवाही करण्याचे आदेश देवुन स्थानिक गुन्हे शाखेने सापळा तयार करुन ही कार्यवाही केली आहे.
-------स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने दि.८-९-२०१८ राेजी पाेलिस स्टेशन हद्दीतील माैजा गाेेंडखैरी येथे सापळा रचुन आराेपी ने किरायाने घेतलेल्या एका खाेलीमधे बाेलेराे महिन्द्रा चारचाकी एम एच४०एन २६९० या वाहनातुन एकुण ८ लाेखंडी ड्रम मधे १६०० लिटर निळे केराेसिन व खाेलीत साठा केलेले ७ लाेखंडी ड्रम मधे १४०० लिटर निळे केराेसिन असे एकुण ३००० लिटर केराेसिन व माैक्यावर सापडलेले आराेपी विक्की रामचंन्द्र यादव यांना ताब्यात घेतले आहे.आराेपी विरुद्ध पाेलीस स्टेशन कळमेश्वर येथे जिवनावश्यक वस्तु कलम ३,७ अधिनीयम कायद्याअंतर्गत कार्यवाही करन्यात आली आहे.यातील मुख्य आराेपी रामसींग यादव यांच्याविरुद्ध पाेलीस स्टेशन वाडी,नागपुर पाेलीस स्टेशन कळमेश्वर येथे केराेसिन काळाबाजाराची कार्यवाही यापुर्वी ही करन्यात आलेली हाेती.स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता केराेसिन काळाबाजारी करुन अवैधरित्या तस्करांना जास्त दराने विक्री करित असल्याचे उघड झाल्याने याबाबत अधिक तपास करुन या व्यवसायात शामील असलेले परवाना धारक दुकानदार यांचा शाेध घेवुन कार्यवाही करन्याचे निर्देश पाेलीस अधिक्षक यांनी ठाणेदार यांना दिले आहेत.
----सदरची कार्यवाही पाेलीस अधिक्षक राकेश आेला नागपुर ग्रामिण,अपर पाेलीस अधिक्षक माेनिका राऊत,यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक संजय पुरंदरे ,पाेउनि.नरेन्द्र गाैरखेडे,पाे.ह.जयप्रकाश शर्मा,बाबा केचे,चंन्द्रशेखर गडेकर,प्रमाेद बन्साेड,रमेश भाेयर यांनी केले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours