पुणे- एटीएस पथकाने दाभोलकर हत्येप्रकरणी जळगावमधून एकाला ताब्यात घेतलंय.  आलय. जळगावच्या साकळीमधून वासुदेव सुर्यवंशी याला एटीएसने ताब्यात घेतलंय .वासुदेव सूर्यवंशी सनातनचा साधक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वासुदेवच्या घराची तपासणी केल्यानंतर एटीएसकडून ही कारवाई करण्यात आली. वासुदेवची ओळख ही सनातनचा कट्टर कार्यकर्ता अशीच होती. पथकाच्या अत्यंत जलद आणी गोपनीय हालचालीनं खळबळ उडाली. कोणत्याही गोष्टीचा सुगावा लागू न देता एटीएसने ही कारवाई केली. सध्या साकळी गावातून, वासुदेवसह एटीएसचे पथक रवाना झाले असून, या कारवाई बद्दल बोलण्यास, अधिकाऱ्यांनी नकार दिला.
दरम्यान, दर दिवशी दाभोलकर प्रकरणात नवीन माहिती समोर येत आहे. गुरूवारी डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातला आरोपी अमोल काळेचा ताबा सीबीआयनं घेतला. बंगळुरू येथून त्याला पुण्यात आणण्यात आले असून काल न्यायालयासमोर उभंही केलं. त्याच्या डायरीत अजून गिरीश कर्नाड, के. एस. भगवान, नरेंद्र नायक आणि चमकल स्वामी चार व्यक्तींच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. 'एक ही दिन 4 अधर्मीयों का विनाश' असा उल्लेख या डायरीत करण्यात आला आहे.
रम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या कशासाठी आणि कुणाच्या सांगण्यावरून केली याचं गूढ अजून पूर्णपणे उलगडलेलं नाहीये. पण शरद कळसकरच्या चौकशीतून सीबीआयला महत्त्वाची माहिती मिळालीय. त्यातून दाभोलकरांवर गोळ्या झाडल्यानंतर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर पळून कसे गेले, याचा उलगडा झालाय. अतिशय चलाखीनं त्यांनी सीसीटीव्ही नसलेला रस्ता शोधून काढला होता.
असा होता घटनाक्रम...
- गोळ्या झाडल्यानंतर सचिन अंदुरे आणि शरद कळसकरनं ओंकारेश्वर मंदिराच्या मागून नदीपात्राच्या रस्त्यानं दुचाकीवर पळून जायला सुरुवात केली.
- नदीपात्रातल्या रस्त्यानं डेक्कनच्या मागच्या बाजूने थेट कर्वेनगरचा रस्ता पकडला.
- सकाळच्या सुमारास अत्यंत शांत असलेल्या या रस्त्याने त्यांनी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा परिसर गाठला.
- तिथेच त्यांनी त्यांच्याजवळ असलेली दोन्ही पिस्तुलं आणि गाडी त्यांना सांगण्यात आलेल्या व्यक्तीच्या ताब्यात दिली.
- या व्यक्तीची ओळख देण्यात दोन्ही आरोपींनी अजूनपर्यंत तरी असमर्थता दर्शवलीये.
- कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाहेर गाडी आणि पिस्तुल दिल्यानंतर तिथूनच त्यांना एका कारमध्ये बसायला सांगण्यात आलं.
- या कारनं दोघांनाही शिवाजीनगर बस स्थानकात आणून सोडलं.
- शिवाजीनगरहून या दोन्ही आरोपींनी औरंगाबादची एसटी बस पकडली.
हत्येनंतर औरंगाबादला पळून गेल्याची माहिती कळसकरनं सीबीआयला दिलीय. कळसकरनं दिलेल्या माहितीची सीबीआय उलटतपासणी करतेय. पण पाच वर्षांचा कालावधी उलटल्यानं या माहितीची खातरजमा करण्याचं मोठं आव्हान साबीआयपुढे आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours