नवी दिल्ली- पेट्रोल-डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असताना प्रदूषणापासून वाचविणाऱ्या सीएनजीसह घरगुती गॅस आणि विमान प्रवासावरही दरवाढीचं सावट आहे. केंद्र सरकारने विनाअनुदानित गॅस सिलेंडरचा दर तब्बल ५९ रुपयांनी वाढविल्याने सर्वसामान्य ऐन सणासुदीला महागाईत चांगलेच भरडले जाणार आहेत. अनुदानित सिलिंडरमध्ये २.८९ रुपयांची वाढ करण्य़ात आली आहे. या सोबतच विमानांच्या इंधनांचे दर वाढल्यानं विमान कंपन्या आता ही तूट ग्राहकांच्या तिकीटातून वसूल करणार आहे.

दरम्यान, पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीनंतर आता सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्येही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची घसरण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरवाढीवर त्याचा परिणाम  होतोय. त्यामुळे सर्वसामान्य त्रस्त झालेत. त्यातच आता ऑक्टोबरमध्ये पीएनजी गॅसची किंमत ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांनी नेमकं काय करायचं असा प्रश्न उपस्थित राहतो.

वाहतूक खर्चामुळे काही शहरांमध्ये इंधन किंमती मुंबईपेक्षा अधिक आहेत. माध्यमांच्या अहवालानुसार यात परभणी, नंदुरबार, नांदेड, लातूर, जळगाव, बीड, औरंगाबाद आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश आहेत. इथं पेट्रोल ९० रुपयांपेक्षा जास्त आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours