दुधाला पंचविस रूपये भाव देण्याची सरकारची घोषणा पोकळ ठरलीय. पन्नास दिवस उलटून गेले तरी सरकारकडून दुध डेअरींना अजुन 180 कोटींचं अनुदान दिलं गेलं नाही. सरकारने हे थकवलेले 180 कोटी रूपये रूपये तातडीने द्यावे नाहीतर आंदोलन करू असा इशारा कम्युनिष्ट पक्षाचे नेते अजित नवले यांनी दिलाय.

राज्यात दुध दरासाठी झालेल्या जन आंदोलनानंतर राज्य सरकाने प्रतिलीटर पंचविस रूपये दर देण्याची घोषणा केली होती. मात्र आज पन्नास दिवस उलटून गेले आहे तरी शेतकऱ्यांना अजुनही हा दर काही मिळाला नाही. सरकारकडून दुध डेअरींना प्रतिलीटर पाच रूपये अनुदान जाहीर केले मात्र आजवरचे 180 कोटी रुपये थकवल्याने शेतकरी दुध दरापासून वंचित आहेत.

सरकारने लवकरात लवकर दुधाचे अनुदान जमा करावे अन्यथा पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष समितीचे अजित नवले यांनी दिलाय.

काही महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी राज्यभर आंदोलन केलं होतं. या आंदोलनात दूध रस्त्यावर ओतलं गेल्यानं त्याची दखल देशपातळीवर घेतली गेली. तर राजू शेट्टी यांनी मुंबईचा दूधपुरवढा तोडण्याचाही इशारा दिला होता. या आंदोलनात विविध शेतकरी संघटना एकत्र आल्या होत्या.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours