मुंबई, 31 मार्च : महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 5 नवे रुग्ण समोर आले आहे. एक रुग्ण मुंबईत, 2 पुण्यात आणि 2 बुलढाण्यात असे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 225 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 39 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी महाराष्ट्रात दोन लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी एकाचा मृत्यू पुण्यात आणि दुसरा मृत्यू हा मुंबईत झाला.
कोरोनाव्हायरस देशात फैलाव वाढत आहे. आज लॉकडाउनचा 7 वा दिवस आहे, परंतु संक्रमित लोकांची संख्या वाढतच आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात संक्रमित लोकांची संख्या आतापर्यंत 1251 वर पोहोचली आहे. त्यापैकी 1117 सक्रिय प्रकरणे आहेत, तर 32 लोकांचा कोरोनाने बळी गेला आहे. मात्र, 102 जणांनी या आजारावर मातही केली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours