औरंगाबाद: मोदी सरकारची फौज ही बहुजन आणि मुस्लिम समाजावर अन्याय करत आहे. आता ही सत्ता उलथवून आणण्याची वेळ आलीये अशी घणाघाती टीका एमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवेसी यांनी केली. तसंच मोदी सरकारमुळे दलित- बहुजन समाज पीडित आहे अशी टीकाही ओवेसींनी केली.
आज औरंगाबादच्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेत एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपासह काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडलं. मोदी सरकारच्या काळात दलित- बहुजनांवर अत्याचार वाढले असून या सरकारला हद्दपार करण्याची वेळ आली असल्याचा घणाघात ओवेसी यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिलं असून संविधानाचं संरक्षण करण्याची वेळ आली असल्याचं त्यांनी सांगितलं.
देशाला राज्यघटना ही बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलंय. नेहरू, गांधी, मोदी यांनी संविधान दिलं नाही, मग आंबेडकरांचेच अनुयायी अन्याय सहन का करताय असा सवाल करत असादुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
प्रकाश आंबेडकर जिथं जिथं जातील एमआयएम त्यांच्या पाठीशी उभं राहणार, वंचित समाजाला आंबेडकरच न्याय देऊ शकतात असंही ओवेसी म्हणाले.
तसंच अन्याय करणाऱ्यांच्या अन्याय संपवायची वेळ आता आली आहे, आणि ही आपली जबाबदारी आहे,आता या सरकारला हद्दपार करण्याची गरज आलीये असंही ओवेसी म्हणाले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours