जिल्ह्या प्रतिनिधी शमीम अकबानी
महाराष्ट्र राज्य भाजप सरकारच्या चतुर्थ वर्षपूर्तीचा निषेध 
भंडारा -  महाराष्ट्रातील भाजप सरकारला आज दिनांक 31 ऑक्टोबर 2018 ला चार वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्ताने भंडारा जिल्हा युवक काँग्रेस कार्यकर्ते विडंबनात्मक योगा करून तसेच गांधीजींच्या अहिंसात्मक विचारांचे भजन गाऊन "निषेधासन" या अहिंसात्मक आंदोलनाद्वारे भाजप सरकार विरोधी राग व्यक्त करण्यासाठी युवक काँग्रेस तसेच काँग्रेस पदाधिकारी व नागरिकांनी महात्मा गांधी चौक भंडारा येथे बुधवार ला अहिंसात्मक आंदोलन घेण्यात आले. यात जनतेची लूट आणि फसवणूक करणाऱ्या भाजपच्या केंद्र आणि राज्यातील नेतृत्वाला त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्याच्या या आंदोलनामागे हेतू होता.       
  भाजपने सत्तेत येण्या पूर्वी भरमसाट आश्‍वासने दिली होती. तरुण , महिला, शेतकरी ,कष्टकरी, नोकरदार, व्यापारी सर्वांनाच भावनिक अमिषे देऊन फसविले आणि आश्वासनपूर्ती ची वेळ आल्यावर तो चुनावी जुमला होता असे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितले. आज जनता दुष्काळाच्या सावटाखाली आहे. तरीही दुष्काळ जाहीर करण्यात दिरंगाई करण्यात येत आहे. जलयुक्त शिवार योजना पूर्णतः फसली, महागाईवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला अपयश आले आहे. शेतमालाला दिलेला हमीभाव प्रत्यक्ष काँग्रेस सरकार पेक्षाही कमी आहे. नोटबंदी आणि जीएसटी मुळे लहान मोठे व्यवसायिक संकटात सापडले. त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला. सरकारला याचा जाब विचारण्याची योग्य वेळ हीच आहे.           
 युवकांना सरकारने प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासन दिले होते, प्रत्यक्षात सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दरवर्षी लाखो तरुणांना आहेत त्या नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. दुसरीकडे शासनाचा नारा देणारे आणि देशाचा चौकीदार असल्याचे ओरडून सांगणारे पंतप्रधान राफेल प्रकरणी मूग गिळून गप्प आहेत. भाजपच्या या नाकर्त्या कारभाराचा निषेध करण्यासाठी सदर आंदोलन पार पाडण्यात आले. यात विविध योगासने करून अशा फसवणूक करणाऱ्या फसणवीस सरकारचा निषेध करण्यात आला. कार्यक्रमात युवक कांग्रेस तसेच काँग्रेस चे पदाधिकारी कार्यकर्ते दुकानदार व जनतेने मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदविला....Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours