रिपोर्टर सैय्यद जाफरी
रोहणा येथील घटना
भंडारा: मोहाडी तालुक्यातील रोहणा इथुन अवैधरीत्या रेतीची वाहतुक करणाऱ्यां टिप्परच्या धडकेत रूपचंद गोरबा आगाशे वय ६० वर्ष रा.रोहणा या इसमाचा जागीच मृत्यू झाला . सदर घटना रोहणा-दहेगाव च्या मधोमध घडली.अपघात एवढा भयानक होता की,मृतकाचे शरीर छिन्न-विछीन्न होवुन शरीरातील सर्व अवयव उघडपणे दिसुन येत होते.
मृतक रूपचंद यांचा दुधाचा व्यवसाय असुन ते नेहमीप्रमाणे दुग्ध डेअरीवर दुध पोहचवुन शेतावर सायकलने जात होते.त्याचवेळी मागेहुन अवैधरीत्या रेती भरून दहेगाव कडे जाणाऱ्यां  टिप्पर  क्र.एम.एच.३६,एफ ३७७४ हा रूपचंदचा कर्दनकाळ बनुन आला व एका क्षणात रूपचंदचा जिव गेला.

मागील दोन महिन्यांपासुन रोहणा येथे सुरनदीतुन अवैध वाळुचा उपसा सुरू आहे.सुरनदी मधुन ट्रॅक्टरद्वारे वाळु बाहेर काढुन चार ते पाच ठिकाणी जमा केली जाते व नंतर ट्रक,टिप्परमध्ये जेसीबी द्वारे भरून त्याची विक्री करण्यात येते.रोहणा इथुन रात्रंदिवस वाळुचा भरणा व वाहतुक केली जात असुन दिवसाला शंभरच्या वर टिप्पर वाळुची वाहतुक केली जाते.या सगळया प्रकाराने त्रस्त होवुन नागरीकांनी अनेकदा तक्रारीही केल्या मात्र महुसल विभाग असो वा पोलिस विभाग यांच्याकडुन कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.

घटनास्थळी ट्रक अडविल्याने अतिरीक्त पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर,उपविभागीय अधिकारी पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी जोगदंड,तहसिलदार सुर्यकांत पाटील यांच्यासह इतरही अधिकारी दाखल झाले होते. मृतकाच्या कुटूंबाला अपघात झालेल्या ट्रक मालकांनी आर्थीक मदत द्यावी,अवैध वाळु व्यवसायीकांवर कारवाई करण्यात यावी,तहसिलदार  व पोलीस निरीक्षक यांना निलंबित करण्यात यावे आदि मागण्या यावेळी नागरीकांकडुन करण्यात आल्या.  गावकऱ्यांचा रोष लक्षात घेता पोलीसांनी गावकऱ्यांना न जुमानता ट्रकच्या चाका खालुन मृतकाचे शरीर बाहेर काढुन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले व टिप्पर पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आले.पोलीस विभागाने ट्रक मालकाला घटनास्थळी बोलविण्याचा साधा प्रयत्नही न झाल्याने पोलीस विभागाविषयी नागरिकांकडुन रोष व्यक्त करण्यात आला.






शिवसेना करणार आंदोलन

शिवसेना उप जिल्हा प्रमुख सुधाकर कारेमोरे

त.मोहाडी जवळील रोहणा गावी येथे अवधैरित्या रेती वाहतुक करनाऱ्यां टिप्पर खाली रुपचंद आगाशे यांचा दबुन घटना स्थळी जागीच म्रूत्यु झाला.व घटनेची माहीती मिळताच.शिवसेना उपजिल्हा GB प्रमुख सुधाकरजी कारेमोरे यांनी  घटना स्थळी धाव घेतली.व अवधैरेती वर आळा घालन्यासाठी.तहसीलदार व ठाणेदार यांना निलंबीत करन्याची मागणी.व म्रुत्यु झालेल्या शेतकर्याच्या कुटुबंयाना आर्थिक मदत यावी.हि.मागणी केली.असे न झाल्यास शिवसेना आपल्या स्टाईलने पुर्ण जिल्हात आदोलन करेल.अशी माहीती सुधाकर कारेमोरे यांनी दिली.यावेळी प्रामुख्याने उपस्थित शिवसेना शहर प्रमुख नितीन सेलोकर.उपतालुका प्रमुख नितेस वाडीभस्मे.बुथ प्रमुख नितेस पाटील.किशोर यादव.मनोहर जांगळे.बुथ प्रमुख संजय झंझाड.व शिवसेना विभाग प्रमुख ईश्वर भोयर.व समस्त शिवसैनिक.गावकरी प्रामुख्याने  उपस्थित होते.

विडियो देखे- 


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours