धुळे, 28 ऑक्टोबर : धुळे-सुरत महामार्गावरील छडवेल गावाजवळ ट्रक आणि शालेय विद्यार्थ्यांच्या रिक्षाची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात बाप लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेत संदीप गावित यांच्यासह त्यांची मुलगी दीपाली गावित हिचा जागीच मृत्यू झाला.
छडवेल परिसरात भरधाव ट्रक शालेय विद्यार्थ्यांच्या रिक्षाला धडकला. त्यानंतर या रिक्षात असणारे अनेक विद्यार्थी जखमी झाले. त्यानंतर स्थानिकांनी अपघात झालेल्या ठिकाणाकडे धाव घेत जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले.
या अपघातात जखमी झालेल्या 10 जणांना तातडीने जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तर काही गंभीर जखमींना धुळ्याला हलवण्यात आलं आहे.
दरम्यान, ऐन दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या अपघाताने गावित परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावित कुटुंबाला घरातील कर्त्या पुरुषासोबत चिमुकल्या मुलीला गमवावं लागलं आहे. त्यामुळे छडवेल परिसरात शोकाकुल वातावरण आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours