कोल्हापूर: मागिल वर्षीच्या फॉर्म्युल्यानुसार आधारीत एफआरपीमध्ये अधिकचे 200 रूपये दिल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फार्म्युला आम्हाला मान्य असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलंय. मात्र त्यासाठी आधी मुख्यमंत्र्यांनी जीआर काढावा अशी मागणी देखील राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेत केलीय.

आज जयसिंगपूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भव्य ऊस परिषद झाली. यामध्ये विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

ऊस शेतकऱ्यांना साडे नऊ टक्के बेसनुसार एफआरपी द्यावा, 10 टक्के बेसनुसार एफआरपीस आमचा विरोध असल्याचंही राजू शेट्टींनी ठणकावून सांगितलंय. एकरकमी एफआरपी द्यावा अन्यथा संघर्ष अटळ आहे असा इशाराही त्यांनी दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या तत्व उपस्थितीत झालेल्या ऊस परिषदेत अशीच मागणी झाली होती. माञ, शासनाने एफआरपीत छेडछाड  करून बेस बदलून दहा केला होता. फक्त हा बेस बदलावा अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours