मनमाड: मालेगाव शहरातील गोल्डन नगर भागातील नागछाप झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. तब्बल ९ सिलेंडरचा स्फोट झाल्याचं कळतंय. या आगीत ५० ते ६० झोपड्या जळून खाक झाल्या आहे.  घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहे.
मालेगाव शहरातील गोल्डन नगर भागातील नागछाप झोडपट्टीत आज सायंकाळी आग लागली. आग लागल्यानंतर काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे अनेक झोपड्या तिच्या विळख्यात सापडल्या.
सिलेंडर मधून गॅस गळती होऊन आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आग लागल्यानंतर तब्बल 9 सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आग पसरत गेली त्यात सुमारे 50 ते 60 झोपड्या जळाल्या असून आगीत सध्या तरी कोणतीही जीवितहानी अथवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले. मात्र, बारीक गल्ल्यामुळे घटनास्थळी पोहोचण्यास त्यांना विलंब होत होता. आग वाढत जात असल्याचे पाहून मनमाड,सटाणा,धुळे येथून अग्निशमन दलाच्या गाड्या मागविण्यात आल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours