मुंबई: बोट दुर्घटनेत लोकांचा जीव वाचला ही सगळ्यात सुदैवाची गोष्ट आहे. पण, सरकारकडे पैसे नसताना अशा योजना काढतात आणि लोकांचे जीव धोक्यात घालतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सरकारचा उरलेला काळ नीट ढकलावा अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.
शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमात बोट बुडाल्याची दुर्घटना घडलीये. या दुर्घटनेत सिद्धेश पवार हा तरूण बेपत्ता आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या दुर्घटनेवर राज्य सरकारवर टीका केलीये.
लोकांचा जीव वाचला ही सगळ्यात सुदैवाची गोष्ट आहे, त्याकरता परमेश्वराचे आभार !, सरकारकडे पैसे नसताना अशा योजना काढतात आणि लोकांचे जीव धोक्यात घालतात अशी टीका राज ठाकरेंनी केली.
तसंच नुसत्या मोठमोठ्या घोषणा करून लोकांची फसवणूक सुरू आहे. लोकांच्या तोंडाला फक्त पानं पुसली जातायंत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाकरता राज्य गहाण ठेवू म्हणणारं हे राज्य सरकार ही स्मारकं कशी बांधणार ? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थितीत केलाय.
राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे सांगणारा आर्थिक अहवाल आलेलाच आहे. मुख्यमंत्र्यांनी आता सरकारचा उरलेला काळ नीट ढकलावा असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours