लाखनी-----प्लॉस्टिक बंदी अमलबजावणीसाठी प्रशासनाने कंबर कसली असुन लाखनी शहरात पुन्हा दुसऱ्यावेळी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ,नगरपंचायत लाखनी व पाेलीस विभाग,यांच्या संयुक्त विद्यमाने २७ किलाे.नॉनवाेवन बँग,कँरीबैग, प्लॉस्टिक पिशव्या,प्लॉस्टिक चमचे,वाटी,ग्लास,युज अँन्ड थ्राे डब्बे,जप्त केले आहे.ह्या वस्तु बाळगणाऱ्यांकडुन १०,०००/-रु.दंड वसुल केला व पाेलीस कार्यवाही करण्यासाठी पंचनामा केला.राज्य शासनातर्फे २१जुन पासुन प्लॉस्टिक बंदी सुरु करन्यात आली असुन या बंदी च्या अमलबजावणीसाठी विवीध शहरात प्लॉस्टिक जप्तीची माेहीम प्रशासनाने सुरु केली आहे.त्यानुसार शहरात प्रशासनाने तर्फे कार्यवाही चा बडगा उगारण्यात आला आहे.लाखनी शहरात सिंधी लाईन,नँशनल हायवे येथील दुकानावर कार्यवाही करुन जवळपास २७ किलाे.प्लॉस्टिक साहित्य जप्त करण्यात आले.तसेच व्यापाऱ्यांना प्लॉस्टिक चा वापर व विक्री बंद करऩ्याबाबत कळविले असुन शासनास सहकार्य करण्याबाबत कळविले .या संयुक्त कार्यवाही मधे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अर्जुण राठाेड व महेश भिवापुरकर तसेच लाखनी नगरपंचायत चे मुख्याधिकारी कांचन गायकवाड,प्रशासकिय अधिकारी लाेकेश कटरे व कर्मचारी यांनी सहभाग घेतला।
Home
जनसमस्या
ताज़ा ख़बर
भंडारा
लाखनी मधे दुसऱ्यांदा प्लास्टिक जप्तिची प्रदुषण विभागा तर्फे कार्यवाही: एकुण २७किलाे प्लॉस्टिक बँग जप्त
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours