05 ऑक्टोबर : परतीच्या पावसानं मराठवाड्याच्या अनेक भागात हजेरी लावली आहे. सर्वात जास्त टंचाईग्रस्त असलेल्या लातूर शहरात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तसेच जिल्ह्याच्या अनेक भागात गारपीट देखील झाली.
रेणापूर तालुक्याला गाठपीटीनं चांगलंच झोडपून काढलंय. या गारपीटीमुळे सोयाबीनसह इतर पीकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यामुळे आधीच दुष्काळाच्या संकटानं चिंतेत सापडलेल्या लातूरचा बळाराजाला आता दुहेरी संकटाला तोंड द्यावं लागतंय.
तर एकीकडे मान्सूनने ओढ दिल्याचा फटका आता गावांसोबतच शहरांनाही बसणार आहे. मुंबईकरांच्या डोक्यावर भविष्यात पाणीकपातीची तलवार आहे. मागच्या वर्षीच्या मानाने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातला पाणीसाठी यंदा 8 ते 10 टक्क्यांनी कमी आहे. सध्या मुंबईकरांना 336 दिवस पुरेल इतका पाणीसाठी शिल्लक आहे.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातही पाणीसाठा कमी आहे. 29 टीएमसी क्षमतेच्या धरणात 27 टीएमसी पाणी आहे. त्यामुळे महापालिकेला 1300 ऐवजी 1100 एमएलडी पाणी उचलण्याची परवानगी देण्यात आली आहे.
तसेच पुणेकरांना एकवेळ पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे निर्णय काल कालवा समितीच्या बैठकीत घेतल्याचं समजतय. मात्र असा कोणताही निर्णय झालेला नसून पुणे करांना दोन्ही वेळी पाणी मिळेल अस स्पष्टीकरण पालकमंत्री गिरीष बापट यांनी स्पष्ट केलंय.
राज्यात पावसाची परिस्थिती पाहता यंदा खरीपला पाणी देण्याच संकट ओढवलंय, हे चित्र पाहता राज्यात पिणाच्या पाण्याबरोबर कृषी आणि उद्योगाच्या पांच्याच नियोजन करण्यात येताय. त्यातही पिण्याच्या पाण्याला प्राधान्य राहील असा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours