मुंबई: #MeToo चळवळीमुळं देशात वादळ निर्माण झालं. चित्रपट, पत्रकारिता, साहित्य,संगीत आणि राजकारण या सर्वच क्षेत्राला या चळवळीनं हादरे बसले. अनेक महिलांनी पुढं येवून आपल्यावर झालेल्या लैंगिक छळाची उघडपणे चर्चा केली. 1980 च्या दशकात महाराष्ट्राच्या राजकारणात असच एक वादळ निर्माण झालं होतं. त्या वादळच्या केंद्रस्थानी होते तत्कालीन उपमुख्यमंत्री रामराव आदिक. जर्मनीच्या दौऱ्यात त्यांनी केलेले जे प्रताप वृत्तपत्रांनी बाहेर आणले त्यामुळं त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी #MeToo नव्हते मात्र वृत्तपत्रांनी ते प्रकरण लावून धरल्यामुळं त्यांना आपलं पद सोडावं लागलं.
हॅनोव्हरचा हँगोव्हर
गोष्ट आहे 1984 च्या एप्रिल महिन्यातली. त्यावेळी दिग्गज नेते वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते बॅरिस्टर रामराव आदिक उपमुख्यमंत्री होते. 'रसिक'पणासाठी त्यांची सर्वत्र ख्याती होती. मात्र उघडपणे त्याची चर्चा कधी होत नव्हती. एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी आदिक जर्मनीच्या दौऱ्यावर गेले होते.
जर्मनीच्या हॅनोव्हर या शहरात त्यांना आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी जायचं होतं.जर्मनीला जातानाच्या प्रवासादरम्यान विमानात त्यांनी मद्यप्राशन केलं आणि जे घडू नये ते घडलं. त्या घटनेनं महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ निर्माण झालं.
विमानात काय घडलं?
रामराव आदिकांनी विमानात एवढं मद्य प्राशन केलं की त्यांना काही भानच राहिलं नाही. त्या अवस्थेत त्यांनी एक हवाई सुंदरीला नकोसा स्पर्श करत असभ्य वर्तन केलं. महाराष्ट्रासारख्या राज्याचा उपमुख्यमंत्री आणि वजनदार नेत्याच्या या वर्तनाने ती हवाई सुंदरी घाबरून गेली. तिने या प्रकरणाची कुठे वाच्यता केली नाही.
पण टाईम्स ऑफ इंडियाने हे प्रकरण पहिल्यांदा उघडकीस आणलं. त्याकाळी सोशल मीडियाही नव्हता आणि टी.व्ही चा सुद्धा फारसा प्रसार झाला नव्हता. नंतर इतर वृत्तपत्रांनीही हे प्रकरण लावून धरलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours