यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यात दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षक वाघिणींनीने गेला महिनाभरात सर्वांनाच गुंगारा दिला. मात्र, आता तिचा ठावठिकाणा लागलाय. तिला पकडण्यासाठी आरंभलेल्या शोध मोहिमेदरम्यान वन विभागाला एक आशेचा किरण सापडलाय. राळेगावच्या जंगलात वाघिणीचे आणि तिच्या बछड्यांच्या पायाचे ठसे आढळून आले असल्याने, आतापर्यंत हवेत तीर मारणाऱ्या वनविभागाला नरभक्षक वाघीण हाती लागण्याची आशा निर्माण झालीय.
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावच्या जंगलात नरभक्षक वाघिणीच्या शोधात जंगल पिंजून काढणाऱ्या वनविभासाठी आढळलेल्या या ठशांनी एक आशेचा किरण निर्माण केलाय. 13 जणांचा जीव घेणाऱ्या या वाघिणीला ठार मारण्याच्या आदेशाला सुप्रीम कोर्टानं हिरवा कंदील दिल्यापासून टी-1 नामक या नरभक्षक वाघिणीच्या मागावर वनविभाग आहे. एक महिना जंगजंग पछाडूनही निराशा हाती लागलेल्या वनविभागासाठी वाघिणीसह दोन बछड्यांच्या पायांचे आढळलेले ठसे म्हणजे मोठी आनंद वार्ता आणि भयभीत असलेल्या परिसरातील नागरिकांसाठी सुटकेचा श्वासच म्हणावा लागेल.
वाघिणीच्या शोधासाठी राबवलेली मोहीम आजवरची सर्वात वादग्रस्त आणि चर्चीत मोहीम ठरलीय. सुरुवातीला शिकारी शहाफतअली खाननं महिला वन अधिकाऱ्याला रात्री हॉटेलवर बोलवल्यानं वाद निर्माण झाला होता. असे झाल्यने शहाफतअली खानला जंगलातून बाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर वादग्रस्त शिकाऱ्याला पुन्हा मोहिमेत सामील करुन घेण्याची नामुष्की वन अधिकाऱ्यांवर ओढावली. त्यानंतर काही केल्या शोध लागत नसल्यामुळे वाघिणीच्या शोधासाठी दोन हत्तींना आणण्यात आलं होतं. त्यातल्या एका पिसाळलेल्या हत्तीनं धुमाकूळ घालत बेस कॅम्पमधूल पळ कढला आणि जवळच्या गावातील एका महिलेला ठार मारलं तर एकाला जखमी केलं होतं. या प्रकारानंतर शोध मोहिमेत सामिल करण्यात आलेल्या दोन्ही हत्तींना माघारी पाठवण्यात आलं. त्यानंतर वाघिणीच्या शोधासाठी इटालियन केन कोर्सो जातीच्या दोन कुत्र्यांचं पथक आलंय. आंतरराष्ट्रीय गोल्फ पटू ज्योती रंधावा हे कार्लस आणि बस्टर या त्यांच्या दोन प्रशिक्षित इटालियन श्वानांसह मोहिमेत सहभागी झाले आहेत.
इतकं सगळं करूनही वाघिणीचा थांगपत्ता लागत नव्हता. त्यामुळे हतबल झालेल्या वनविभागाच्या मोहिमेला नरभक्षक वाघिणीच्या पायांचे नुसते ठसेही नवं बळ देणारे ठरणार आहेत.
Post A Comment:
0 comments so far,add yours