रत्नागिरी: बनावट गुणपत्रिका तयार करणारं मुंबई विद्यापीठातलं रॅकेट रत्नागिरी पोलिसांच्या हाती लागलं आहे. रत्नागिरीतल्या फिनोलेक्स कॉलेजमधल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी सुयश शेटे यानं रॅकेटच्या मदतीनं बनावट गुणपत्रिका तयार केली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
बनावट गुणपत्रिका बनवल्यायानंतर सुयशने दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत फिनोलेक्स कॉलेजच्या कर्मचाऱ्याला संशय आल्यानं ही गुणपत्रिका पडताळणीसाठी पुन्हा मुंबई विद्यापीठाकडे पाठवण्यात आली. यावेळी ही गुणपत्रिका बोगस असल्याचं कॉलेजच्या निदर्शनास आलं.
यावरून कॉलेजचे प्राध्यापक संजय कुलकर्णी यांनी रत्नागिरी पोलिसांत या विद्यार्थ्याविरोधात तक्रार दिल्यानंतर रॅकेटचा पर्दाफाश झाला. याप्रकरणात विद्यार्थ्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर यात मुंबई विद्यापीठाच्या अनेक कर्मचाऱ्यांचा समावेश असावा असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.
तर या रेकेटमध्ये विद्यापीठातले आणखी किती कर्मचारी सहभागी आहेत आणि त्यानी आणखी अशा किती बनावट गुणपत्रिका तयार केल्यात याचा तपास आता पोलीस करतायत. पण या घटनेमुळे पुन्हा एकदा शिक्षण विभागाची लक्तरं वेशीवर टांगली गेली आहेत.
Post A Comment:
0 comments so far,add yours