मुंबई, 18 ऑक्टोबर : मुंबईमध्ये ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या नायजेरियन टोळीतील एकाला मुंबई पोलीस आणि आरपीएफने ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांनी ही सगळ्यात मोठी कारावई केली आहे. काही नायजेरियन लोक संयुक्त अभियानात ड्रग्ज पुरवठा करत होते. पण मुंबई पोलिसांनी यावर कारवाई केली आहे.
मुंबईच्या माझगाव परिसरात रात्रीच्या सुमारास हा छापा टाकण्यात आला. काही नायजेरियन लोक या ठिकाणी ड्रग्ज पुरवठा करत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या हाती लागली. ही टोळी हाणून पाडण्यासाठी पोलीस आणि आरपीएफ यांनी मिळून मोठा सापळा रचला आणि त्यांच्या अड्ड्यावर रात्रीच छापा टाकला.
या छाप्यामध्ये एका ड्रग्ज माफियाला अटक करण्यात आली आहे. तर ही कारवाई करताना एक आरपीएफ जवान जखमी झाला आहे. पोलिसांनी आणि आरपीएफने घटनास्थळी मोठा सापळा रचला आणि या ड्रग्ज माफियांना रंगे हात पकडलं.
अचानक पोलिसांना पाहिल्यानंतर मोठी खळबळ उडाली आणि पळापळ सुरू झाली. यावेळी पोलिसांनी मारहाण करण्यास सुरूवात केली आणि यात एक आरपीएफ जवानही जखमी झाला. त्यांच्यावर सध्या जेजे रुग्णालायात उपचार सुरू आहे. तर यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours