मुंबई, 18 ऑक्टोबर : देशभरातील 50 कोटी मोबाईल नंबर बंद होण्याची भीती आहे. ज्या ग्राहकांनी सिम कार्ड खरेदी करताना फक्त आधार कार्ड हेच ओळखपत्र म्हणून जमा केलं होतं, अशा ग्राहकांचं सिम कार्ड बंद होण्याची भीती आहे. त्यामुळे देशभरातील मोबाईल युजर्स सध्या चिंतेत आहेत.

काय आहे या संकटमागील कारण ?

काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय देत मोबाईल कंपन्या ग्राहकांच्या ‘केवायसी’ (know your customer) साठी आधारचा वापर करू शकत नाहीत, असा आदेश  दिला होता. कोर्टाच्या या निर्णयामुळेच मोबाईल कंपन्यांना ग्राहकांची आधारविषयक माहिती हटवावी लागेल.

त्यामुळे ज्या ग्राहकांनी फक्त आधार कार्ड ‘केवायसी’ साठी जमा केलं होतं, त्यांना आता आपले दुसरं ओळखपत्र जमा करावं लागेल. अन्यथा त्यांचं सिम कार्ड बंद होणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours