अंबरनाथ: ५० हजारांची लाच घेऊन पोलिसाने मोटारसायकल वरून धूम ठोकल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आला आहे. उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा रायटर पद्माकर आस्वले याने हा प्रताप केला आहे.
कॅम्प नंबर ५ मधील एका भंगार व्यावसायिकाची अडवलेल्या गाडीवर कारवाई न करण्यासाठी पोलीस आस्वले याने ८० हजारांची लाच मागितली होती. मात्र भंगार व्यावसायिकाने दोन दिवसांची वेळ मागितली.
दरम्यान, भंगार व्यावसायिकाने या प्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला या संबंधी तक्रार केली. दुसरीकडे आस्वलेनं भंगार व्यावसायिकासोबत तगादा लावूनच धरला अखेर ८० हजारांचा हप्ता हा ५० हजारांवर ठरला.
Post A Comment:
0 comments so far,add yours