मुंबई: तमाम मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने परळ रेल्वे स्थानकाला टर्मिनसचा दर्जा दिला असून, लवकरच म्हणजे नवीन वर्षात परळ टर्मिनसवरुन ट्रेन सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय. सीएसएमटी, दादर आणि कुर्ला रेल्वे स्थानकावरचा ताण कमी करण्याच्या उद्दिष्टाने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
दादर आणि कुर्ला रेल्वे स्थानकावर जाऊन लोकल पकडणाऱ्या मुंबईकरांसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्यामुळे, रेल्वे प्रशासनाकडून मुंबईकरांसाठी हे नवीन वर्षाचं गिफ्ट ठरणार आहे.
या निर्णयामुळे केवळ ट्रेन पकडण्यासाठी म्हणून दादरला किंवा कुर्ल्याला जाणाऱ्या प्रवाशांची दगदग कायमची संपणार आहे. दादर आणि कुर्ला रेल्वे स्थानकांवरचा ताण कमी करण्याच्या दृष्टीकोनातून परळ रेल्वे स्थानकाला टर्मिनस म्हणून घोषित करण्यात आलंय. मध्ये रेल्वेने काम संपण्याची डेडलाईन डिसेंबर महिना ठरवली असली तरी, नवीन वर्षात म्हणजे मार्च 2019 पासून परळ टर्मिनसवरुन लोकल सुटतील. तसंच भविष्यात कधी दादरला समस्या उद्भवल्यास परळहून जादा गाड्या सोडता येणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं म्हटलंय. हा सीएसएमटी, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनसवरचा ताण कमी करण्याचा प्रयत्न अस्याल्याचं रेल्वे प्रशासनानं म्हटलंय.
सद्याच्या घटकेला नवीन रूळ टाकणे, नव्या प्लॅटफॉर्मची निर्मिती, प्रभादेवी स्थानकाला जोडणारा नवीन पूल, परळ रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजुने साईडिंगची सोय या आणि इतर आवश्यक बाबींच्या पूर्ततेसाठी मध्य रेल्वे प्रशासनानं कंबर कसलीय. या प्रकल्पासाठी रेल्वे प्रशासनाला तब्बल 51 कोटी रूपये खर्च येणार असल्याची माहिती आहे. सुरूवातीच्या टप्प्यात परळहून उपनगरीय गाड्याच सुटतील, त्यानंतर लांब पल्ल्याच्या गाड्यासुद्धा परळहून सोडण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours