पुणे: कथित माओवादी समर्थक आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखांना कोर्टाकडून तूर्तास दिलासा मिळालाय. या दोघांना 1 नोव्हेंबरपर्यंत अटक न करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. मात्र त्याचवेळी पुणे कोर्टानं अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि सुधा भारद्वाज यांचा जामीन अर्ज फेटाळलाय. यानंतर गोन्साल्विस, परेरा आणि सुधा भारद्वाज यांना अटक करण्यात आली आहे.
भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि माओवाद्यांशी संबंधांच्या आरोपावरुन पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी कथित समर्थकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपप्रकरणी गौतम नवलखा यांच्यासह प्रसिद्ध तेलगु कवी प्रा. वरवरा राव, कामगार नेत्या सुधा भारद्वाज, मानवी हक्क कार्यकर्ते अरुण फरेरा आणि वर्नोन गोन्साल्वीस यांना पुणे पोलिसांनी ऑगस्टमध्ये अटक केली होती.
या अटकेविरोधात काही विचारवंतांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours