नागपूर, 14 ऑक्टोबर : परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे अकबर यांनी भारतात येताच ईमेलद्वारे आपला राजीनामा पाठवला आहे. अकबर यांच्यावर महिला पत्रकाराचा लैंगिक छळ केल्याचा आरोप होता. सीएनएन न्यूज18ला सूत्रांनी ही माहिती देण्यात आली आहे. पण या सगळ्या प्रकरणावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधातील लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी दिली होती. पण या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, हेही पाहावं लागेल, असंही शहा म्हणाले होते.
एम. जे. अकबर यांच्याविषयी पक्षाकडून आलेली ही पहिलीच अधिकृत प्रतिक्रिया होती. पण आता त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे यावर आता भाजपची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
#MeToo मोहिमेंतर्गत एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. यानंतर परदेशात असणाऱ्या अकबर यांना सरकारने ताबडतोब भारतात बोलावून घेतले. अकबर हे मीडिया संस्थांमध्ये संपादक म्हणून कार्यरत असताना अनेक महिला पत्रकारांसोबत त्यांनी आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
काँग्रेसनेही केली होती अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी
#MeToo चळवळीत लैंगिक छळाचा आरोप झालेले परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम.जे.अकबर यांची हकालपट्टी करावी अशी मागणी काँग्रेसनेही केली होती. पक्षाचे प्रवक्ते जयपाल रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली.
अकबर यांच्यावर चार महिला पत्रकारांनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव येतोय. त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांची हकालपट्टी करा अशी मागणीही होत होती.
Post A Comment:
0 comments so far,add yours