मुंबई: मुंबईकरांना आजपासून पाणी जपून वापरावं लागणार आहे. कारण गुरुवारपासून संपूर्ण मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचं मुंबई महापालिकेनं जाहीर केलं आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे हा मोठा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे.

यंदा पाऊस कमी झाल्यामुळे धरण क्षेत्रात 15 टक्के कमी पाणीसाठी उपलब्ध आहे. जुलै 2019 पर्यंत मुंबईची तहान भागवण्यासाठी पाणीपुरवठ्याचं नियोजन आवश्यक असल्यानं महापालिकेनं पाणीकपातीचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईकरांनो आता पाण्याचा जपून वापर करा.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांत यावर्षी १५% कमी पाणीसाठा जमा झाला आहे. परतीचा पूरेसा पाऊस तलाव क्षेत्रात न पडल्यामुळे तलावांत १५% कमी पाणी साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जुलै २०१९ पर्यंत मुंबईकरांना पाणीपुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणुन आजपासुन संपुर्ण मुंबईत १०% पाणी कपात जाहीर केली आहे.

या पाणी कपातीचा फारसा परिणाम मुंबईकरांवर होणार नाही आहे. मात्र पाणी जपून वापरण्यास सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. पावसाने दगा दिल्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा, मोडकसागर, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा या सर्व धरण क्षेत्रांमध्ये कमी पाणीसाठी झाला आहे. त्यामुळे पाण्यासाठी मुंबईकरांना आता हात आवरता घ्यावा लागणार आहे.

तर दुसरीकडे मुंबईत पाण्याची टंचाई निर्माण झाली असली तरी सरकारने पिण्याची सोय केली आहे असं म्हणायला हवं.

कारण, संस्कृती जपण्यासाठी कायम आग्रही राहाणाऱ्या भाजप सरकारचं दारूप्रेम पुन्हा एकदा वादात सापडलं आहे. आधी ऑनलाईन दारू विकण्याचे मनसुबे रचणाऱ्या सरकारनं आता भल्या सकाळीच म्हणजे 8 वाजता दारूची दुकानं उघडण्याचा निर्णय घेतला आहे
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours