वर्ध्यातील पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडाराच्या परिसरात एक स्फोट झाला. या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. १३ जण जखमी झाले आहे. जखमींना सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुलगाव इथं केंद्रीय दारुगोळा भांडाराचा ५० किलोमीटरचा हा परिसर आहे. या परिसराला लागूनच सोनेगाव आबाजी गाव आहे. आज या गावाच्या हद्दीत स्फोटकं निकामी करण्यात येणार होती. आज सकाळी साडेसहा वाजता या कामाला सुरुवात करण्यात आली. शंकर चांडक नावाचा ठेकेदार हे बाॅम्ब निकामी करण्याचे काम करतो.

बाॅम्ब निकामी करण्यासाठी स्फोटक घेऊन गाडी आली होती. स्फोटकांच्या पेट्या खाली उतरवत असताना हातातून स्फोटकांची एक पेटी निसटली आणि खाली पडली. त्यामुळे स्फोट झाला. हा स्फोट इतका भंयकर होता की, या स्फोटात ५ जण जागीच ठार झाले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours