रामटेक ते भंडारा या राज्य महामार्गाचा भंडारा शहरात बंद पडलेला काम पूर्ण करा . मुख्यमंत्र्यांना निवेदन.  भंडारा :— केंद्र शासनाने मंजूर केलेला रामटेक ते भंडारा महामार्ग  चे बांधकाम भंडारा शहरात बंद पडलेले आहे . हे बांधकाम तात्काळ सुरू करण्यात यावे , भंडारा शहराचा विकास व्हावा , या रस्त्यात येणारे अतिक्रमण निष्पक्ष हटविण्यात यावे , मेन रोडच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूला समान मोजणी करून रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे . या मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांचे मार्फत अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे , विष्णुदास लोणारे , कन्हैया नागपुरे , पुरूषोत्तम गायधने , विकास निंबार्ते सरपंच भोजापूर , ज्ञानेश्वर निकुरे यांनी प्रत्यक्ष भेटून मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य , मुंबई यांना निवेदन दिले .
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours