 गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा 
भंडारा  दि. 29:- जीवनात यश-अपयश येत असतात. अपयश मिळाले म्हणून खचू नये आणि यश डोक्यात जाऊ देऊ नका. आयुष्यात मिळालेले फळ हे आपल्या प्रयत्नावर अवलंबून आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी हा कुठेही कमी नाही किंवा शहरी भागातील विद्यार्थी हा मागे नाही. प्रगतीचा आलेख हा आपल्या प्रयत्नावर अवलंबून आहे. प्रयत्नात सातत्य असणाऱ्यांना निराशा पदरी पडत नाही. शिक्षणावर होणारा खर्च हा आपल्या पालकाच्या कष्टाची किंमत आहे. या कष्टाला विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांची जोड मिळाल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल आहे. उत्तम शिक्षणाला दुसरं पर्याय नाही त्यामुळे शिक्षणाला संस्काराची किल्ली मिळवून यश गाठा असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती धरेंद्र तुरकर यांनी केले. 

जिल्हा परिषद शिक्षण विभागाद्वारे आयोजित मार्च 2018 च्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभात अध्यक्षीय्‍ भाषणात ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख्य पाहुणे म्हणून महिलाव बाल कल्याण सभापती रेखाताई ठाकरे, बांधकाम सभापती प्रेमदास वणवे, समाजकल्याण सभापती रेखाताई वासनिक, जिल्हा परिषद सदस्य निलकंठ कायते, शिक्षणाधिकारी प्राथमिक एल.एस. पाच्छापूरे व उपशिक्षणाधिकारी विजयकांत दुबे उपस्थित होते. 

शिक्षणाधिकारी एन.एस. पाच्छापुरे यांनी शिक्षणाचे विविध पैलू समजावून सांगतांना कौतुकाची थाप पाठीवर सहजासहजी मिळत नाही. कौतुक हे प्रयत्नांशिवाय प्राप्त होत नाही, असे ते सांगितले. परिक्षेच्या काळात पालक व विद्याथ्या्रंच्या संवेदना वाढतात. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करण्यासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी रेखाताई ठाकरे, प्रेमदास वनवे, रेखाताई वासनिक यांची भाषणे झालीत. 
यावेळी भंडारा जिल्हयातील मार्च 2018 च्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रामाणपत्र परीक्षेत 90 टक्के पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थी व पालकाचे सत्कार स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात आले. यात उच्च माध्यमिक गटात जिल्हयातील 9 शाळेतील 21 व माध्यमिक गटात 43 शाळेतील 240 विद्यार्थ्यांचा समावेश होता. मार्च 2018 च्या शालांत वार्षिक परीक्षेत माध्यमिक गटात जिल्हयातील 19 हजार 54 विद्यार्थ्यांपैकी 16 हजार 508 व उच्च माध्यमिक गटातील 18 हजार 544 विद्यार्थ्यांपैकी 16 हजार 455 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यापैकी जिल्हयातील विविध शाळेतील माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातून 261 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून प्राविण्य प्राप्त केले होते. त्या 261 प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार आज अखिल सभागृहात शिक्षण विभाग भंडाराच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाला पालक व विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने हजेरी लावली होती.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours