रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी 31 डिसेंबरपर्यंत सहभागी व्हावे
भंडारा  दि. 29:- शासनाने रब्बी हंगाम 2018-19 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्हयात राबविण्याचा निर्णय घेतला असून या योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत राज्यातील सर्व अधिसूचित पिकांकरीता 31 डिसेंबर 2018 व उन्हाळी पिकाकरीता 1 एप्रिल 2019 अशी आहे. कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा बंधनकारक तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छीक आहे. कर्जदार शेतकऱ्यांचा विमा हप्ता बँकेमार्फत भरला जाईल तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विहित केलेल्या अर्जासह विमा हप्ता विहित कालावधीमध्ये बचत खाते असलेल्या बँकेच्या शाखेमध्ये  भरावा लागणार आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2018-19 मध्ये भंडारा जिल्हयामध्ये राबविण्याकरीता बजाज अलियॉन्झ जनरल ईशुरन्स कं.लि. कॉमरझोन, 1 ला मजला, टॉवर 1, समर्थ अशोक मार्ग, येरवडा, पूणे-411006, दुरध्वनी क्र. 020-66240137 व टोल फ्रि क्र. 180002095959 यांना कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 
योजनेंतर्गत समाविष्ट पीक, विमा संरक्षित रक्कम तपशिल खालील प्रमाणे असून, विमा हप्ता दर हा वास्तवदर्शी दराने आकारला जाणार आहे. तथापि,रब्बी हंगामामध्ये सर्व शेतकऱ्यांनी भरावयाचा प्रती हेक्टरी विमा हप्ता दर 1.5 टक्के असून जिल्हा निहाय पुढील प्रमाणे आहे. 
पीकाचे नाव विमा संरक्षित रक्कम (रु.प्रती हेक्टर) शेतकऱ्यांनी भरावयाचा 
                                                                   विमा हप्ता रक्कम 
                                                          भंडारा 
गहू बागायत  25000/-                                 375/-
गहू जिरायत  17500/-                                262.50
हरभरा          17500/-                                262.50
उन्हाळी भात  45000/-                                  675/-

या योजनेंतर्गत निश्चित करण्यात आलेला पीक निहाय प्रती हेक्टरी विमा हप्ता दर व शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात भरावयाचा विमा हप्ता यामधील फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान समजण्यात येईल आणि हे अनुदान केंद्र व राज्य शासनामार्फत समप्रमाणात दिले जाईल. 
विमा संरक्षणाच्या बाबी
प्रतिकुल हवामान घटकांमुळे पेरणी, लावणी, उगवण न होणे. पीक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट. हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत झालेले नुकसान अशा आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours