क्राईम रिपाेर्टर संदिप क्षिरसागर
   लाखनी---  लाखनी  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर लाखनी व साकोली येथे उडान  पुलाचा बांधकामाचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग  प्राधिकरण च्या वतीने जेएमसी कंपनीला मंजूर करण्यात आला होता. 
       लाखनी येथील उडान पुलाचा बांधकाम Jmc कंपनी  चालू करण्यापूर्वी  लाखनी चे तहसीलदार साहेब  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे अधिकारी  ,अशोका बिल्डकॉन चे अधिकारी तसेच लाखनी गावातील प्रतिष्ठित नागरिकां समक्ष  बैठक तहसील कार्यालयात आयोजित केली होती  बैठकीत वेगवेगळे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते त्यात सर्विस रोड, रोड च्या साईड ला पक्की नाली बांधकाम अतिक्रमण हटवणे अश्या अनेक बाबींवर चर्चा करण्यात आली होती.त्याच अनुषंगाने सर्विस रोड बनविणार म्हणून गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी पुढाकार घेऊन 100 फुटाच्या आत असलेले दुकाने घरे स्वतःहून एन दिवाळी समोर असताना सुद्धा पाडली.
       आजच्या घडीला लाखनी व साकोली येथील उडान पुलाचा काम युद्ध पातळी वर सुरू झालेला आहे पण Jmc कंपनीने उडान पुलाचा काम चालू करताना लाखनी गावातील कोणत्याही प्रतिष्ठित वेक्तीना विश्वासात न घेता युद्ध पातळी वर सुरू केला आहे. Jmc कंपनीने सर्वांसमोर दिलेले आस्वासन ज्यात पुलाचा काम सुरू करण्याआधी सर्विस रोड चालू करू, नाली बांधकाम करू तसेच राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दखल घेऊनच काम सुरू करणार असे आश्वासन सर्वांसमक्ष दिले होते परंतु Jmc कंपनीने स्वतःच्या मनानेच काम सुरू झाल्यावरून वाहतूक ही मुख्य रस्त्यावरूनच चालू ठेवली आहे त्यातल्या त्यात मोट्या मालवाहतूक गाड्यांना जाण्यासाठी फक्त 8 ते 10 फुटाचीच जागा असल्याचे मोक्का चौकशी केली असता आढळून येते आणि त्यामुळेच रस्त्यावरून अश्याच प्रकारची वाहतूक जर चालू राहिली तर मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही जर असे झाल्यास त्यास सर्वस्वी जिम्मेदार Jmc कंपनी , राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व प्रशासनाची राहील .
त्याचप्रकारे Jmc ने रस्त्याच्या दोन्ही बाजूला पक्की नाली बांधून देणार असे म्हटले होते पण आजच्या घडीला नाली बांधकामास कोणत्याच प्रकारची सुरुवात करण्यात आली नाही असे युवक काँग्रेस ने  लाखनी चे तहसीलदार यांना निवेदनातून केली आहे.
        7 दिवसाच्या आत Jmc कंपनीने लाखनी येथे  सर्विस रोड चालू करावा, पक्की नाली बांधकाम करावे तसेच रोड च्या मधोमध असलेले बॅरिगेट्स वेवस्थित लावावे जेणेकरून अपघातास आळा बसेल अशी मागणी युवक काँग्रेस च्या वतीने निवेदनातून केली आहे जेएमसी कंपनीने  उडान पुल करण्यासंदर्भात जे अस्वासन दिले होते ते पूर्ण करावे अन्यथा लाखनी नगरीत Jmc कंपनीचा काम थाम्बविण्यात येईल असे सुद्धा युवक काँग्रेस ने निवेदनातून म्हटलं आहे . निवेदन देता वेळी नगरसेवक दत्ता गिर्हेपुंजे , युवक काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष इंजि.विशाल भोयर,यशवंत खेडीकर,साकोली विधानसभा युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष मोहन निर्वाण , युवक काँग्रेस चे सुरज पंचबुद्धे , निखिल सिगनजुडे , अजिंक्य वाघाये, सुरज लांडगे, अजित मेश्राम, राजू निर्वाण,लिंकन ढेंगे,बबलू खेडीकर,अजय गायधने,महेश निर्वाण,चेतन बांते उपस्थित होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours