मुंबई: सध्या देशभर दिवाळीचा उत्साह आहे. सुप्रीम कोर्टाने आखून दिलेल्या नियमांमध्ये प्रत्येकजण फटाके फोडण्याचा प्रयत्न करतोय. मात्र दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मात्र आपल्या व्यंगचित्रातून धमाका करताना दिसत आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या एका व्यंगचित्रातून राज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जोरदार चिमटे काढले आहेत.
राज ठाकरे यांनी आज (मंगळवारी) सलग दुसऱ्या दिवशी केंद्र आणि राज्य सरकारवर आपल्या व्यंगचित्रातून फटकारे ओढले. राज यांनी दोन व्यंगचित्र प्रसिद्ध केली आहेत. त्यातील पहिल्यामध्ये देवेंद्र फडणवीस अभ्यंगस्नानासाठी बसलेले दिसतायत. त्याचवेळी त्यांचा कार्यकर्ता येऊन सांगतो, ‘साहेब, अख्खा महाराष्ट्र तुम्हाला धुवायला आलाय, पाठवू?’
Post A Comment:
0 comments so far,add yours